Pakistan Cricket : पाकिस्तानने नव्या फिल्डिंग कोचची केली नियुक्ती, ‘या’ दिग्गजावर सोपवली जबाबदारी…

Pakistan Cricket Fielding Coach : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी नवीन क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. पीसीबीने माजी प्रथम श्रेणी खेळाडू मोहम्मद मसरूर यांची राष्ट्रीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटीत ते संघासोबत होते.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या मोहम्मद मसरूरला तीन दौऱ्यांसाठी कंत्राट देण्यात आले आहे. पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, रेड-बॉल फॉरमॅटचे मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांनी त्याच्या नावाची शिफारस केली कारण ते मसरूरच्या कामावर खूप खूश होते. मसरूर हे पाकिस्तान शाहीन आणि अंडर 19 संघांचे मुख्य प्रशिक्षक आहेत. मोहम्मद मसरूर काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन स्टीव्ह रिक्सनचा सहाय्यकही होते, परंतु नंतर पीसीबीशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.
Muhammad Masroor has been appointed as Pakistan Cricket Team’s fielding coach for the tours of Australia, Zimbabwe, & South Africa.
He is one of the finest coaches in Pakistan domestic circuits & has worked with Shaheens & various age group teams.
He was also on Pak’s dugout… pic.twitter.com/6IK8SJh7XI— Faizan Lakhani (@faizanlakhani) October 28, 2024
अलीकडच्या काळात पाकिस्तानी खेळाडू त्यांच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे टीकेला सामोरे गेले आहेत आणि सूत्राने सांगितले की, गिलिस्पी आणि गॅरी कर्स्टन या दोन परदेशी प्रशिक्षकांनी पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी संघांसोबत व्यावसायिक क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ठेवण्याचा आग्रह धरला होता.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान होणार परीक्षा..
मोहम्मद मसरूरची पहिली परीक्षा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असेल. पाकिस्तानचा संघ नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळणार आहे. त्यासाठई मोहम्मद रिझवानला पाकिस्तानचा मर्यादित षटकांचा नवा कर्णधार बनवण्यात आला आहे.





