दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक साईबाबा यांचे निधन
Updated On:

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा यांचे शनिवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबादमधील निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात उपचार सुरू होते. जी एन साईबाबा यांच्या पित्ताशयावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली होती.
मात्र, या शस्त्रक्रियेनंतर शनिवारी रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 57 वर्षांचे होते. जी एन साईबाबा यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना 10 दिवसांपूर्वी निम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
मात्र, शनिवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर रात्री 8.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या काही सहकाऱ्यांनी दिली आहे.





