दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शासकीय निवासस्थान सोडणार, नवा पत्ता काय?

Arvind Kejriwal । दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल ( ता ४ ऑक्टोबर ) शनिवारी मुख्यमंत्री निवासस्थान रिकामे करणार आहेत. यानंतर अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभेtतील आपचे खासदार अशोक मित्तल यांच्या घरी राहणार आहेत. अशोक मित्तल यांचे 5 फिरोजशाह रोड येथे घर आहे.
आपचे प्रमुख नवी दिल्लीतून त्यांच्या विधानसभा आणि दिल्ली निवडणुकीचा प्रचार करणार आहेत. पक्षाचे नेते, नगरसेवक, आमदार आणि खासदार यांनी अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या घरांची ऑफर दिली होती. अरविंद केजरीवाल अशोक मित्तल यांच्या घरीच राहणार असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती.
यापूर्वी, ‘आप’कडून सांगण्यात आले होते की, अरविंद केजरीवाल पुढील एक-दोन दिवसांत सिव्हिल लाइन्समधील ‘फ्लॅगस्टाफ रोड’वरील दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करतील, कारण त्यांच्यासाठी नवीन निवासस्थान निश्चित करण्यात आले आहे. दिल्ली परिसरात ते आपल्या कुटुंबासह राहायला येणार आहे.
Arvind Kejriwal । ‘आप’च्या सूत्रांनी हा दावा केला
पक्षाच्या सूत्रांनी दावा केला होता की अरविंद केजरीवाल आपल्या कुटुंबासह मंडी हाऊसजवळील फिरोजशाह रोडवरील ‘आप’च्या राज्यसभा खासदारांना दिलेल्या दोन सरकारी बंगल्यांपैकी एका बंगल्यात राहायला जाऊ शकतात. त्यांनी सांगितले की, दोन्ही बंगले रविशंकर शुक्ला लेनवर असलेल्या ‘आप’ मुख्यालयापासून अवघ्या काही मीटर अंतरावर आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे केजरीवाल म्हणाले की, ते नवरात्रीच्या काळात फ्लॅगस्टाफ रोडवरील सरकारी निवासस्थान रिकामे करतील. अरविंद केजरीवाल येत्या एक-दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करतील कारण त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी निवासस्थान निश्चित करण्यात आले आहे. असे पक्षाने एका निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, केजरीवाल दिल्ली विधानसभेत प्रतिनिधित्व करत असलेल्या नवी दिल्ली मतदारसंघात आपल्या कुटुंबासोबत राहतील, असे पक्षाने म्हटले होते. यापूर्वी आपने केजरीवाल यांना राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख म्हणून अधिकृत निवासस्थान देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती.
हे वाचले का ?
ईडीने माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनला बजावले समन्स; नेमकं प्रकरण काय ?





