Dinesh Karthik : ‘श्रेयस अय्यर कसा बाहेर राहू शकतो?’ संतप्त दिनेश कार्तिकचा निवड समितीला सवाल, पाहा VIDEO

Dinesh Karthik raise question on Selection Comittee : भारताचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक याने ९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी जाहीर झालेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात श्रेयस अय्यरला स्थान न मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. या निवडीला त्याने अन्यायकारक ठरवले आहे. यापूर्वी भारताचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी बीसीसीआयच्या निवड समितीच्या निर्णयावर टीका केली आहे. काहींच्या मते, ही निवड टी-२० क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरसाठी जागा नसल्याचे संकेत देते.
श्रेयस अय्यरने पंजाब किंग्जच्या कर्णधारपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने २०१४ नंतर प्रथमच अंतिम फेरी गाठली, जरी अंतिम सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव स्वीकारावा लागला. अय्यरला संघातून वगळण्याबाबत निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर म्हणाले, “श्रेयसबाबत तुम्हाला त्याला सांगावे लागेल की तो कोणाच्या जागी येऊ शकतो. यात त्याची चूक नाही किंवा आमचीही नाही. आम्हाला फक्त १५ खेळाडू निवडायचे आहेत. त्याला आपल्या संधीची वाट पाहावी लागेल.”
तो कसा बाहेर राहू शकतो?
Dinesh Karthik comes in support of Shreyas Iyer after selection committee excluded him from T20Is.
Thanks Anna🙏🏾pic.twitter.com/cpuZiPvRUe
— Himachal Kings (@PbksOfficial) August 22, 2025
दिनेश कार्तिकने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत आपली नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, “श्रेयस अय्यर कुठे आहे? हा मोठा प्रश्न आहे, नाही का? तो कसा बाहेर राहू शकतो? एक वेळ समजू शकते की संघाने २० पैकी १७ सामने जिंकले आहेत, त्यामुळे ठीक आहे. पण त्याला पाच स्टँडबाय खेळाडूंमध्येही स्थान न देणे? टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने तुम्ही भविष्यासाठी काय योजना आखली आहे?”
हेही वाचा – AUS vs SA : लुंगी एनगिडीने रचला इतिहास! ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
त्याच्यासाठी दारे बंद आहेत का?
दिनेश कार्तिक पुढे म्हणाला, “त्याच्यासाठी दारे बंद आहेत का? हे थोडे अन्यायकारक आहे आणि मला अशी अपेक्षा नाही. कारण त्याने कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि दबावात फलंदाज म्हणूनही त्याची कामगिरी आणखी उल्लेखनीय राहिली आहे.” आशिया कपसाठी भारतीय संघाची निवड आणि श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीमुळे क्रिकेट विश्वात चर्चेला उधाण आले आहे. निवड समितीच्या या निर्णयावर पुढील काही दिवसांत आणखी प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.





