Bjp Politics : मोठी बातमी..! भाजपच्या माजी खासदाराचा तडकाफडकी राजीनामा; राज्यात खळबळ
Bjp Politics : उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला (BJP) मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Bjp Politics : उत्तर प्रदेशातील राजकारणात भाजपला आणखी एक राजकीय धक्का बसला आहे. आंवला लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशातील राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर कश्यप यांनी सोशल मीडियावर ‘टाटा-बाय-बाय’ अशी पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली होती. आता त्यांनी पक्ष सोडल्याचे वृत्त समोर आले आहे. (Bjp Politics)
भाजपने उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या आठ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत धर्मेंद्र कश्यप यांचे नाव नसल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर ‘टाटा-बाय-बाय’ अशी पोस्ट केली. मात्र, त्या पोस्टमध्ये त्यांनी भाजपचा थेट उल्लेख केला नव्हता. त्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आणि स्थानिक राजकीय वर्तुळात त्यांच्या पुढील निर्णयाबाबत चर्चा रंगली. (Bjp Politics)
2024 च्या निवडणुकीतील विरोधकांबाबत नाराजी
धर्मेंद्र कश्यप यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला विरोध करणाऱ्या काही नेत्यांवर कारवाई न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे ताज्या वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले आहे. राज्यसभा उमेदवारी न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवरही त्यांची नाराजी वाढल्याची चर्चा होती. (Bjp Politics)
कश्यप यांची समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत भेट झाल्याच्या चर्चाही यापूर्वी समोर आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत सपा प्रवेशाच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. मात्र, समाजवादी पक्षात प्रवेशाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. (Bjp Politics)
मुलगी कीर्ती कश्यप यांच्या राजकीय प्रवेशाचीही चर्चा
धर्मेंद्र कश्यप यांच्या मुलगी कीर्ती कश्यप यांना राजकारणात पुढे आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचीही स्थानिक पातळीवर चर्चा आहे. राज्यसभा उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर कश्यप यांच्या नाराजीचे हेही एक कारण असल्याचे काही वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, याबाबत कश्यप यांच्याकडून अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. (Bjp Politics)
बसपा-सपा ते भाजप असा राजकीय प्रवास
धर्मेंद्र कश्यप यांनी 2002 मध्ये बसपाच्या तिकिटावर उत्तर प्रदेशातील सनहा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली. त्यानंतर ते समाजवादी पक्षात गेले आणि 2007 मध्ये सपा उमेदवार म्हणून पुन्हा आमदार झाले. उत्तर प्रदेश सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम केले. 2009 मध्ये त्यांनी आंवला लोकसभा मतदारसंघातून सपा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली; मात्र भाजपच्या मेनका गांधी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. (Bjp Politics)
यानंतर 2013 मध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आंवला मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला. मात्र 2024 मध्ये समाजवादी पक्षाचे उमेदवार नीरज मौर्य यांनी त्यांचा पराभव केला. आता राज्यसभा उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे लक्ष लागले आहे. (Bjp Politics)






