यवतमाळ – शिवसेना फोडण्याचे प्रयत्न भाजपकडून सातत्याने सुरू असताना आता शिवसेनेनेही तसाच पलटवार करण्यास सरूवात केली असून यवतमाळचे ज्येष्ठ नेते व भाजपचे माजी मंत्री संजय देशमुख 19 ऑक्टोबर रोजी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजप उमेदवार मुरजी पटेल 6 वर्ष निवडणूक लढवू शकत नाहीत, उमेदवारी रद्द होणार?, ठाकरे गटानं घेतला आक्षेपhttps://t.co/N5mGP8mfSg
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 15, 2022
ते यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचे मोठे नेते आहेत. तेथे त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिंदे गटाचे संजय राठोड यांना शह देण्याची सेनेची योजना आहे असे सांगितले जाते. संजय देशमुख यांचा शिवसेनेत प्रवेश हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. विदर्भात संजय देशमुख यांच्या शिवसेना प्रवेशाने सेनाला चांगलेच बळ मिळणार आहे असे मानले जात आहे.
Andheri Bypoll: लोकं मला बहुमतानं विजयी करतील; ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विश्वास https://t.co/MZEhRaMwBe
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 15, 2022