Shirur : वनपालांकडून सामाजिक वनीकरणाचा भांडाफोड!
Shirur : मोजमाप पुस्तिका, बिले, व्हाउचर, रोपांची संख्या, प्रत्यक्ष कामांची तांत्रिक तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, शासन निधीचा गैरवापर आढळल्यास रक्कम वसूल करावी, अशी मागणी आहे.

शिरूर : शिरूर सामाजिक वनीकरण विभागातील वृक्षलागवड आणि नर्सरीच्या कामांवरून मोठे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिरूर तालुक्यातील फाकटे येथील गायरानात खत, पाणी व खुरपणीअभावी तीन वर्षांत २० टक्के झाडेही शिल्लक राहिली नाही. बिले लाटली आहेत. केंदूर, फाकटे, रामलिंग नर्सरीतील कामांची गुणवत्ता, खर्च, देयकांचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी अर्जदार शंकर पिंगळे यांनी केली आहे.
वनविभागातील वनपाल बी. ए. गायकवाड यांनी (दि.१७) जुलै, (दि.३०) जुलै आणि (दि.१४) ऑगस्ट रोजी केंदूर येथील वृक्ष लावगड करण्याआधी खते वापरली नाहीत. कामात अनियमितेची व भष्ट्राचाराची सामाजिक वनीकरण विभागात केलेल्या तक्रारी पत्रव्यवहारामुळे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच विभागातील कर्मचाऱ्याने तक्रार केल्याने शिरूर तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे
विभागीय वन अधिकारी दीपक पवार हे तत्कालीन अधिकाऱ्याला पाठीशी घालत असल्याचा आरोपही अर्जदाराने केला असून, त्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. मोजमाप पुस्तिका, बिले, व्हाउचर, रोपांची संख्या, प्रत्यक्ष कामांची तांत्रिक तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, शासन निधीचा गैरवापर आढळल्यास रक्कम वसूल करावी, अशी मागणी आहे.
ऐन दुष्काळात गाफीलपणा
राज्य शासन एकीकडे पर्यावरण संवर्धनासाठी कोटींचा खर्च करीत आहे. मात्र, सामाजिक वनीकरण विभागातील खाबूगिरीमुळे हरताळ फासला जात आहेत. झाडे जगली की कागदावरच वाढली? असा सवाल उपस्थित होत आहे. वनपरीक्षेत्र अधिकारी व विभागीय वन अधिकारी दीपक पवार यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुसऱ्या चौकशी समितीमार्फत तातडीने स्थळपाहणी करून चौकशीचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.
अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही
विभागीय वन अधिकारी दीपक पवार यांच्याशी तीनवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला आहे.





