काजू, मोहाच्या फुलापासून बनवलेल्या दारूला ‘विदेशी’ दर्जा – मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई – काजू आणि मोहाची फुलांपासून बनणाऱ्या दारूला “विदेशी दारू’चा दर्जा देण्याचा निर्णय मत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे आता काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणारी दारू विदेशी दारूच्या दुकानातही विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे काजू बोडांची बाजारपेठ वाढायला मदत होईल, असा राज्य सरकारचा मानस आहे.
मद्य विक्री करणाऱ्या दुकानांची दोन गटात वर्गवारी करण्यात आली. इलाईट आणि सुपर प्रिमियम असे दोन गट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जी छोटी दुकान आहेत ते आपला दुकानाचा विस्तार करून मद्य विक्रीची कक्षा वाढवू शकतात. 600 चौरस फुटांपर्यंत वाढवू शकतात तर सुपर प्रिमियम 600 चौरस फुटांच्या वरती वाढवता येणार आहे. हा निर्णय महसूल वाढवण्यासाठी घेण्यात आला आहे.
महसूल वाढीसाठी एफएल-2 परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. काजूबोंडे, मोहाच्या फुलांपासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेशी मद्य असा दर्जा देण्याचा आणि या पदार्थांसह फळे, फुले यापासून मद्यार्क उत्पादन व त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्यासाठी धोरण आखले आहे.




