सहा हजार संस्थांची परदेशी मदत थांबणार

नवी दिल्ली – आयआयटी दिल्ली, जामिया मिलिया इस्लामिया, इंडियन मेडिकल असोसिएशन, नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी यांसह सहा हजार संस्थांची एफसीआरए नोंदणी गोठवण्यात आली. या परवान्याच्या नुतनीकरणासाठी एक तर या संस्थांनी अर्ज केला नाही किंवा केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याला परवानगी दिली नाही, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
एफसीआरए परवाना गोठवलेल्या किंवा त्याची मुदत संपलेल्या संस्थांमध्ये इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टस्, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, लाल बहादूर शास्त्री राम कॉलेज ऑफ वुमेन, दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरींग आणि ऑक्सफॅम इंडिया यांचाही या संस्थांमध्ये समावेश आहे.
एफसीआरए परवान्याची मुदत एक जानेवारीला संपत होती, असे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणत्याही संस्था अथवा स्वयंसेवी संस्था यांना परदेशी मदत मिळवण्यासाठी एफसीआरए परवाना आवश्यक असतो.





