सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटी कलेक्शन 1 लाख कोटींच्या पुढे
Updated On:

नवी दिल्ली – ऑगस्ट महिन्यात एकूण 1 लाख 12 हजार कोटी रूपयांचे जीएसटी कलेक्शन झाले आहे. सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटी कलेक्शन एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या जीएसटी कलेक्शन पेक्षा यावर्षी झालेले कलेक्शन 30 टक्क्यांनी अधिक आहे अशी माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यात एकूण जे 1 लाख 12 हजार कोटी जीएसटी जमा झाला आहे, त्यातील 20 हजार 522 कोटी रुपये सेंट्रल जीएसटी आहे, 26 हजार 605 कोटी स्टेट जीएसटी आहे तर 56 हजार 247 कोटींचा इंटिग्रेटड जीएसटी आहे.
तथापि ऑगस्ट महिन्यात कलेक्ट झालेल्या जीएसटीचे प्रमाण त्याच्या आधीच्या म्हणजे जुलै महिन्यातील कलेक्शन पेक्षा कमी आहे. जुलै महिन्यात 1 लाख 16 हजार कोटी रुपये इतका जीएसटी जमा झाला होता.





