पिंपरी : प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात राहत असलेल्या अपंग बांधवांना रेशन कार्डचे स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील प्रथम कार्यक्रम ठरला आहे.सध्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन झाल्या आहेत त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना रेशन कार्ड हाताळण्यासाठी त्रास होऊ नये, म्हणून प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवड शहरने पुढाकार घेऊन अन्नधान्य परिमंडळ कार्यालय यांच्याबरोबर सुसंवाद करून दिव्यांग कुटुंबधारकांना रेशन कार्डचे स्मार्ट कार्ड करून वाटप करण्यात आले. अपंग भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महापालिकेचे दिव्यांग कक्षाचे प्रमुख श्रीनिवास दांगट यांच्या हस्ते स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, महिला अध्यक्ष संगीता जोशी, रामचंद्र तांबे, रमेश पिसे, भाग्यश्री मोरे, बाबुराव अहिरे यांच्यासह अपंग बांधव उपस्थित होते. यापुढेही राहिलेल्या अपंगांना रेशन कार्डचे स्मार्ट कार्ड बनवून वाटप करण्यात येईल. तसेच राहिलेल्या त्रुटी दुरुस्त करण्यात येतील, असे कार्यक्रमादरम्यान राजेंद्र वाकचौरे यांनी सांगितले