शिक्रापूरात व्यावसायिक, पोलीस आणि पत्रकारांकडून वृद्धाश्रमात धान्य वाटप
Updated On:

शिक्रापूर- शिक्रापूर येथील व्यावसायिक, पोलीस व पत्रकार यांनी कोरोना लढाईचे पार्श्वभूमीवर गोरगरीब, हातावर पोट असणारे व अनाथ अपंग यांच्यासाठी धान्य शिधाकिटचे वाटप करून सामाजिक दायित्व दाखवले असून खेड तालुक्यातील द्वारका वृद्धाश्रमात धान्य वितरित केले.
याप्रसंगी व्यवसायिक बाबा चव्हाण, पोलीस अनिल जगताप, पत्रकार धंनजय गावडे, प्रशांत मैड, राजेंद्र वारघडे, संस्थेचे संचालक दिनकर पवार उपस्थित होते.
शिक्रापूरात अनेक कामगार, गोरगरिब, हातावर पोट असलेले यांच्यासाठी आम्ही शिधा किट्स तयार केल्या आहेत. आतापर्यंत एकूण 600 किट्सचं वाटप आम्ही सगळ्यांनी केलं आहे. या सगळ्या उपक्रमात अनिल जगताप यांचं चांगलं सहकार्य लाभलं, असं पत्रकार शेरखान शेख यांनी सांगितले.





