पुणे जिल्हा | नवजीवन उद्योग समूहातर्फे अन्नदान ; दरवर्षी सामाजिक बांधिलकी

माळेगाव, (वार्ताहर) – बारामती तालुक्यातील सर्वांचा परिचयाचा असलेल्या नवजीवन उद्योग समूहाच्या वतीने संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यातील दिंडीमधील वारकऱ्यांना राजे अमरसिंह कॉलनी माळेगाव बुद्रुक येथे अन्नदानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
नवजीवन उद्योग समूह पुणे, सोलापूर, सातारा, सांगली येथील नागरिकांना घर बांधण्यासाठी हक्काची जागा देण्यासाठी परिचयात आहे. नवजीवन उद्योग समूह हे वारीतील दिंडीमधील वारकऱ्यांना गेली अनेक वर्षापासून अन्नदानाचा कार्यक्रम घेत आहे. संत सोपानकाका पालखी बारामती येथे पोहोचल्यानंतर वारकऱ्यांना नाष्टा वाटप देण्याचे काम नवजीवन उद्योग समूह करीत आहे.
यावेळी बोलताना नवजीवन उद्योग समूहाचे चेअरमन शितल आप्पा लोखंडे म्हणाले की, वारकऱ्यांना अन्नदान केल्यानंतर व त्यांची सेवा केल्यानंतर पंढरपुरातील विठुरायाचे दर्शन घेतल्याचा भास होतो. यावेळी नवजीवन उद्योग समूहाचे चेअरमन शितल आप्पा लोखंडे, संचालक संतोष जाधव, जयदीप तावरे, अमर शेख, निलेश कोकरे, राहुल चव्हाण, शिलपक बागल, प्रसाद पवार, विठ्ठल वाघमोडे, अभिजीत पिसे उपस्थित होते.





