अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्वीकारला पदभार

मुंबई – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना झिरवाळ यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनीही स्वीकारला पदभार
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी मंत्रालयातील दालनात त्यांच्या विभागाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावाही घेतला. यावेळी सहसचिव कैलास गायकवाड, सहसचिव अरुण कोल्हे, सहसचिव संजय इंगळे यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तत्पूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.





