बंपर डिस्काउंट! खूपच स्वस्तात मिळतोय स्मार्ट टीव्ही, किंमत फक्त 5,999 रुपयांपासून सुरू

Smart TV Offers: नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार असल्यास तुमच्याकडे चांगली संधी आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर Monumental Sale सुरू झाला आहे. या सेलच्या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोन, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तात खरेदी करू शकता. सेलमध्ये स्वस्तात उपलब्ध असलेल्या अशाच स्मार्ट टीव्हीविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 4K QLED Smart TV पर ऑफर
4K QLED Smart TV वर बंपर ऑफर
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये Thomson FA Series चा 43 इंच फुल एचडी एलईडी स्मार्ट अँड्राइड टीव्ही 16,999 रुपयात उपलब्ध आहे. तुम्ही Acer Advance स्मार्ट टीव्ही देखील 20,999 रुपये किंमतीत खरेदी करू शकता. याशिवाय, सेलमध्ये Toshiba कंपनीचा 43 इंट स्मार्ट टीव्ही 20,999 रुपयात उपलब्ध आहे. या टीव्हीवर तुम्हाला 9,850 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळतो.
या व्यतिरिक्त Blaupunkt Quantum Dot च्या QLED टीव्हीला 21,999 रुपये किंमतीत घरी घेऊन जाऊ शकता. तुम्ही जर स्मार्ट टीव्हीऐवजी नियमित एलईडी टीव्ही शोधत असाल तर अवघ्या 5,999 रुपये किंमतीत थॉमसनचा टीव्ही खरेदी करता येईल.
इतर वस्तूंवरही ऑफर
फ्लिपकार्ट सेलमध्ये अवघ्या 6,790 रुपये सुरुवाती किंमतीत वॉशिंग मशीन उपलब्ध आहे. तर फक्त 799 रुपयात रूम हीटर खरेदी करता येईल. वॉटर प्यूरीफायरची किंमत 6,999 रुपयांपासून सुरू होते. वेबसाइटवर 899 रुपये सुरुवाती किंमतीत स्मार्टवॉच उपलब्ध आहे.
दरम्यान, फ्लिपकार्टप्रमाणेच Amazon वरही Great Republic Day Sale ला सुरुवात झाली आहे. ग्राहक बंपर डिस्काउंटसह अनेक वस्तू स्वस्तात खरेदी करू शकतात.





