“हाडा मांसाचे कलाकार…”; AI च्या वापरावर अभिनेत्री शर्मिला शिंदे संतापली

Sharmila Shinde Post| सध्या जगभरात आर्टिफिशल इंडलीजन्स या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील याचा वापर केला जात आहे. मात्र अभिनेत्री शर्मिला शिंदे हिने याबाबत एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. एआयमुळे तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, पण यामध्ये माणसाला मात्र मागे पडत टाकले जात असल्याचे दिसत आहे. नुकतेच मालिकेत एआयचा वापर करून पात्र उभं करण्यात आले होते. यावर अभिनेत्री शर्मिला शिंदेने संताप व्यक्त केला आहे.
अभिनेत्री शर्मिला शिंदेने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, ‘कृपया एआयचा वापर टाळा आणि हाडा मांसाचे कलाकार कास्ट करा. एआयला फार प्रोत्साहन देऊ नका. कास्टिंग करणाऱ्यांनी थोडे कष्ट घेतले तर एक सारखे दिसणारे कलाकार सापडतील. मी ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा सिनेमा बघितला नाही, पण कौतुक ऐकलंय की बाबूजींच्या सिनेमामधल्या भूतकाळ आणि वर्तमानातल्या भूमिकांसाठी सुनील बर्वे व आदिश वैद्य यांचं कास्टिंग अगदी चपखल बसले आहे.’ Sharmila Shinde Post|
View this post on Instagram
पुढे शर्मिलाने म्हटले की, ‘एखाद्या पात्राच तारुण्य किंवा वृद्धावस्था दाखवायला AI कशाला हवय. कला आणि कलाकार अजून जिवंत आहेत.काही विशेष किंवा अपरिहार्य परिस्थितिंमध्ये गर्जेपुर्ता आणि मर्यादित वापर हा तंत्रज्ञानाचा योग्य वापर म्हणून समजला जाऊ शकतो.” सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली असून अनेक युजर्सने यावर प्रतिक्रीया दिल्या आहेत.
शर्मिलच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे तिला घराघरात ओळख मिळाली. सध्या झी मराठीवर ‘नवरी मिळे हिटलर’ला या मालिकेत ती दुर्गा हे पात्र साकारत आहे. तसेच ती लवकरच सिनेमामध्ये झळकणार आहे. ‘लाईफ लाईन’ असे तिच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. Sharmila Shinde Post|
हेही वाचा:

