भाजपा पक्षाला पाच हजार वर्षांचा इतिहास – चंद्रकांत पाटील

मुंबई – भाजपा : काल आज आणि उद्या या शांतनू गुप्ता लिखित व मल्हार पांडे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
भाजपा : काल आज आणि उद्या या शांतनू गुप्ता लिखित व मल्हार पांडे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis यांच्या हस्ते झाले. सर्वे भवन्तु सुखिन: हे भगव्याचे विचार नव्या पीढित रुजवण्यासाठी हा ग्रंथ नक्की उपयोगी ठरेल. #BJP pic.twitter.com/ocreusx2On
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 19, 2022
या कार्यक्रमामध्ये फडणवीस यांच्यासोबतच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासहीत अन्य नेतेही उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणामध्ये चंद्रकांत पाटील यांनी भाजपा ही काही १९५१ साली स्थापन झालेला पक्ष नसून त्याला पाच हजार वर्षांचा इतिहास असल्याचं हिंदुत्वाचा संदर्भ देत म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले,“या पार्टीला (भाजपाला) मोठा वसा आहे, या पार्टीला हात लावता येणार नाहीच. अशावेळी हा ग्रंथ प्रकाशित झाला हे महत्वाचे आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाचं आहे. आम्ही केवळ १९५१ साली स्थापन झालेलो नाही आहोत. आमची परंपरा पाच हजार वर्षांची आहे.” असेही ते यावेळी म्हणाले आहे.





