पद्दुचेरीत मंत्रिमंडळाचा विस्तार; पाच मंत्र्यांनी घेतली शपथ
Updated On:

पदुचेरी – पद्दुचेरीत सत्तेवर आलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून, आज या मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यातील दोन जण भारतीय जनता पक्षाचे आहेत.
मंत्रिमंडळ रचनेविषयी एनआर कॉंग्रेस व भाजपमध्ये प्रदीर्घ काळ चर्चा सुरू होती. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. मागच्या आठवड्यात सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. यानिमित्त या प्रांतात भारतीय जनता पक्ष प्रथमच सत्तेवर आला आहे.
आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये चंदिरा प्रियंगा या महिला मंत्र्यांचाही समावेश आहे. त्या या राज्यातील पहिल्या महिला मंत्री ठरल्या आहेत. राज्यपाल तामिलसाई सौंदरराजन यांनी नवीन मंत्र्यांना अधिकार पदाची शपथ दिली. या राज्यात मुख्यमंत्री रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखाली 7 मे रोजी नवीन सरकार सत्तेवर आले आहे.





