उत्तरप्रदेशात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या
Updated On:

प्रयागराज/लखनौ – उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. त्यात तीन मुलांचा समावेश आहे. ही घटना नवाबगंज पोलिस स्टेशन हद्दीतील खगलपूर गावात शुक्रवारी रात्री घडली, असे त्यांनी सांगितले.
राहुल (42), त्याची पत्नी प्रिती (38) आणि त्यांच्या मुली माही (15), पिहू (13) आणि कुहू (11) यांची त्यांच्या घरी हत्या झाल्याचे आढळून आले. तपासासाठी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक घटनास्थळी पाठवून तपास सुरू करण्यात आला आहे असे पोलीस अधीक्षक अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या घटनेवरून भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर हल्लाबोल केला. भाजप सरकार च्या राजवटीत, संपुर्ण उत्तरप्रदेश पुन्हा गुन्हेगारीत बुडाले आहे असा आरोप त्यांनी केला आहे.





