बारामती, (प्रतिनिधी)- बारामती येथील जिल्हा न्यायालयात झालेले लोक अदालतीमध्ये 5513 खटल्यांचा निपटारा झाला आहे. 12 कोटी 59 लाख 6717 रुपयांची वसुली झाली आहे. जिल्हा न्यायाधीश आर. के. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व न्यायाधीश वर्ग व बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बर्डे व सहकारी वकील यांचे संयुक्त विद्यमाने हे लोक न्यायालय पार पडले. एकूण सहा पॅनलमध्ये दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आय ए आर मरछिया कोर्ट, एम. आर. वानखेडे कोर्ट, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ओ. एम. माळी कोर्ट, डी. पी. पुजारी कोर्ट, पी. पी. काळे कोर्ट, व्ही. व्ही. देशमुख कोर्ट यांच्यासह बारामती बारमधील वकिलांनी काम केले. लोक न्यायालयामध्ये दाखल पूर्व प्रकरणांमध्ये चार कोटी 22 लाख 78 हजार 175 रुपयांची वसुली झाली, मोटार अपघाताचे दहा खटले निघाली निघाले. त्यामध्ये एकूण सात कोटी 89467 रुपयांची नुकसान भरपाई पीडितांना मंजूर करण्यात आली. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कायद्यांतर्गत पाच कोटी 4 लाख 43 हजार 409 रुपये वसूल झाले. तेरा दिवाणी खटले निकाली निघाले असून 64 लाख 46 हजार 448 रुपयांची तडजोड विविध दाव्यामध्ये झाली आहे. करसंबंधीचे (रेवेन्यू) चे 3155 इतके दावे निकाली निघाले आहेत. एक कोटी 14 लाख 24 हजार 603 रुपये वसूल झाले. एकूण 5544 दाव्यामध्ये बारा कोटी एकोनसाठ लाख सहा हजार सातशे सतरा दावे निकाली निघाले आहेत. “नियमितपणे होणाऱ्या लोक न्यायालयामध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी सामील होऊन आपल्या खटल्याचा तडजोडी द्वारे खटले मिटवल्यास कायदेशीर सोपस्कारामुळे होणारा विलंब टळू शकतो, असे मत जिल्हा न्यायाधीश आर. के. देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केले.