Fish Market Rates : मासेप्रेमींच्या खिशाला कात्री! समुद्रातील आवक निम्म्यावर; पाहा आजचे ताजे दर
Fish Market Rates : पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी लागू झाल्याने बोटी किनाऱ्यावर; खोल समुद्रातील मासळीचा पुरवठा घटल्याने दरात मोठी वाढ.

Fish Market Rates – देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी लागू झाल्याने बोटी किनाऱ्यावर परतल्या आहेत. तर, पूर्व किनारपट्टीवरून मासळीची पुरेशी आवक होत नाही. खोल समुद्रासह खाडीतील ताज्या मासळीचा पुरवठा निम्म्यावर आला आहे. ताज्यामध्ये बोंबील, बांगडा आणि कोळंबीचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर, उर्वरित मासळी शीतगृहातून बाजारात दाखल होत आहे. मासळीचे तेजीतील दर कायम आहेत.
मागणी आणि पुरवठा यांचा समतोलामुळे मटण आणि चिकनचे दर स्थिर आहेत. तर, पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने अंडीच्या भावात शेकड्यामागे वीस रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. मासळी बाजारात रविवारी (दि. ७) खोल समुद्रातील मासळी ४ ते ५ टन आणि नदीच्या मासळीची ४०० ते ५०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १२ ते १५ टन इतकी आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) – पापलेट : कापरी : १५००-१६००, मोठे : १५००-००, लहान : १०००-१२००, हलवा : १०००-१२००, सुरमई ११००-१२००, रावस : ९००-१०००, घोळ : ९००-१०००, पाला : १२००-१५००, वाम : पिवळी १०००, काळी : ५००-६००, ओले बोंबील : ५००-५५०. कोळंबी : लहान : २८०-३००, मोठी : ५००-६००, जम्बो प्रॉन्स : १५००-१६००, किंग प्रॉन्स : १०००, मांदेली : १५०-२००, खेकडे : ३५०-४००,
चिंबोर्या : ६००-७००. खाडीची मासळी – बांगडा : ३००-३५०. नदीतील मासळी : रहू : १६०-२००, कतला : १८०-२५०, मरळ : ३५०-४५०, खवली : २५०-३००, आम्ळी : १५०-२००, खेकडे : ३००-४००, चिलापी : ८०-२००, वाम : ६००-६५०. मटण : बोकडाचे ८००, बोलाईचे ८००, खिमा ८००, कलेजी ८४०. चिकन २४०, लेगपीस २९०, जिवंत कोंबडी १८०, बोनलेस ३४०. अंडी : गावरान (शेकडा) ११२० डझन १४०, प्रतिनग १२. इंग्लिश (शेकडा) ६२५, डझन ८४, प्रतिनग ७.





