पहिल्यांदा केलं हाय, नंतर मारली मिठी! रणबीर-दीपिका विमानतळावर दिसले एकत्र; व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले “लवकरच…”

Ranbir Deepika : रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील आवडत्या अॅानस्क्रीन जोडप्यांपैकी एक आहेत. जेव्हा जेव्हा हे दोघेही पडद्यावर एकत्र दिसतात, तेव्हा प्रेक्षकांना त्यांची जोडी खूप आवडते. यामुळे त्यांचे सिनेमे हिट होतात. पण गेल्या काही काळापासून दोघांनीही एकत्र सिनेमात काम केलेलं नाही. नुकतेच या दोघांना एकत्र पाहिले गेले आहे. यामुळे चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक झाले असून त्यांच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण विमानतळावर एकत्र दिसले. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रणबीर विमानतळावर पोहोचताना दिसत आहे. सुरक्षा तपासणीसाठी थांबताच त्याला दीपिका विमानतळावर एका गोल्फ कार्टवर बसलेली दिसते. रणबीर पहिल्यांदा दीपिकाचे स्वागत करतो, नंतर दीपिका तिची कार्ट थांबवते. त्यानंतर रणबीर दीपिकासोबत कार्टमध्ये बसतो. यावेळी रणबीरचा लूक सिंपल असून त्याने काळ्या रंगाचा हुडी, कार्गो जीन्स आणि टोपी घातलेली दिसत आहे.
View this post on Instagram
दीपिका राखाडी रंगाच्या कोटसूटमध्ये खुपच सुंदर दिसत आहे. रणबीर आणि दीपिकाचा आणखी अनेक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर आणि दीपिका एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. त्यानंतर दोघे आपापल्या कारमध्ये बसून निघून जातात. आता चाहते दीपिका आणि रणबीरला एकत्र पाहून खूप आनंदी झाले आहेत आणि दोघांनाही मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची वाट पाहत आहेत.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका कमेंटमध्ये म्हटले आहे की ‘ये जवानी है दिवानी २’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामुळे चाहत्यांना हे दोघेही एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याची आशा वाटत आहे.
हेही वाचा : ट्रम्प सरकारचा आणखी झटका! अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली; शीख आणि मुस्लिम सैनिकांची नाराजी





