माळेगाव निवडणुकीच्या निकालाचा पहिला कल हाती; ‘ब’ वर्गातून अजित पवार विजयी, पहा किती मतं मिळाली?

बारामती : राज्याचे लक्ष वेधलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिला निकाल जाहीर झाला असून ब वर्ग सभासद प्रतिनिधी प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. अजित पवार यांना ९१ तर त्यांच्या विरोधी उमेदवार भालचंद्र देवकाते यांना दहा मते पडले आहेत. वर्गातील एकूण १०२ पैकी १०१ मतदारांनी आपला हक्क बजावला होता.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चौरंगी लढत झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष देणे ही निवडणूक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. निवडणुकीची मतमोजणी बारामतीतील प्रशासकीय भवन मधील अभियांत्रिकी भवन येथे सुरू झाली आहे. सर्वात पहिला निकाल हा अजित पवार यांच्या पॅनलच्या बाजूने जाहीर झाला आहे.
या जागेवर अजित पवार विजयी होणार हे निर्विवाद होते, त्यामुळे ही जागा सोडून इतर जागांसाठी प्रचार झाला होता.माळेगावचे सभासद कोणाच्या बाजूने कौल देतात हे येत्या काही तासात समोर येईल. दरम्यान मतमोजणी केंद्रावर पोलिसांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला असून पारदर्शकपणे मतमोजणी व्हावी यासाठी प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.





