“या मर्दाची टक्कर घेण्याची…” शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची पहिली झलक ; पहिला टीझर जारी

Updated On:

Shinde Group Dussehra Gathering Teaser Released : राज्यात सध्या दसरा मेळाव्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरु असल्याचे दिसत आहे. त्यातच दोन्ही गटाकडून आता वेगवेगळा  दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  ठाकरे गटाला शिवतीर्थ मैदानात सभा घेण्याची परवानगी मिळाली आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. त्यानुसार आता शिंदे गटाकडून आयोजित दसरा मेळाव्याचा पहिला टिझर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

२४ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या दसरा मेळाव्याचा पहिला टीझर शिंदे गटाकडून जारी करण्यात आला आहे. या टीझरमध्ये शिंदे गटाने “बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवलं आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा ऑडिओही जोडला आहे. तसेच बेधडक घणाघाती शब्द मांडणाऱ्या, व्यंगचित्रातून बुरखा फाडणाऱ्या, हिंदवी अभिमान बाळगणाऱ्या, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा… “असा उल्लेख टीझरमध्ये करण्यात आला आहे.

शिवाय बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात टीझरमध्ये म्हटलं, ““गां** औलाद म्हणून कधीही जगू नका, मेलात तरी चालेल. या मर्दाची टक्कर घेण्याची हिंमत कुणीही करता कामा नये, असं दृश्य साऱ्या हिंदुस्तानात उभं राहिलं पाहिजे. ते चित्र मी हिंदुंच्या आणि हिंदुत्वाच्या रुपाने उभा करतोय.” याव्यतिरिक्त “ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. तुम्हा तमाम शिवसैनिकांची ही शिवसेना आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आवाजात म्हटले गेले आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर २४ ऑक्टोबर रोजी शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार? कुणाला लक्ष्य करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...