आधी नाकारले आता केलं कबूल ! भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला केल्याचे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सांगितले..

Pakistan PM Shehbaz Sharif | पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. मात्र आपणच भारताचे मोठे नुकसान केल्याचा दावा पाकिस्तान करत आहे. यानंतर आता स्वत: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मोठी कबुली दिली आहे. सुरुयातील
पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी रावळपिंडीतील नूर खान एअरबेस आणि इतर ठिकाणी भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याची कबुली दिली आहे. भारतीय बॅलेस्टिक मिसाईल नूर खान एअरबेस आणि काही इतर भागावर डागण्यात आले आणि त्यात मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. शहबाज शरीफ यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शेहबाज शरीफ यांचा कबूलनामा
या व्हिडिओत ते म्हणाले की, ९ आणि १० तारखेच्या रात्री अडीच वाजता जनरल असीम मुनीर यांनी मला फोन करून भारताने बॅलेस्टिक मिसाईलने हल्ले सुरू केलेत, ज्यातील एक मिसाईल नूर खान एअरबेसवर पडली असं सांगितले.
आपल्या हवाई दलाने देशाला वाचवण्यासाठी आपल्याच देशात विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केला. यासह त्यांनी चिनी विमानांमध्ये आधुनिक उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर केला, असे त्यांनी कबूल केले.
अमित मालवीय यांचे ट्वीट
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी शाहबाज शरीफ यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. मालवीय म्हणाले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मान्य केले आहे की, जनरल असीम मुनीर यांनी रात्री अडीच वाजता फोन करून भारताने नूर खान एअरबेस आणि इतर ठिकाणी हल्ला केल्याचे सांगितले. पाकिस्तानच्या आत हल्ले केल्यामुळे पंतप्रधानांची रात्री झोप उडाली. यावरूनच ऑपरेशन सिंदूरचे यश, धाडस आणि अचूकता दिसून येते, असे अमित मालवीय म्हणाले.
Pakistan PM Shehbaz Sharif himself admits that General Asim Munir called him at 2:30am to inform him that India had bombed Nur Khan Air Base and several other locations. Let that sink in — the Prime Minister was woken up in the middle of the night with news of strikes deep inside… pic.twitter.com/b4QbsF7xJh
— Amit Malviya (@amitmalviya) May 16, 2025
दरम्यान, नूर खान हे सामान्य एअरबेस नसून येथे हे पाकिस्तानातील VVIP आणि हायलेव्हल मिलिट्री एविशन सेंटर आहे. इस्लामाबादपासून नजीक असलेला हा एअरबेस पाकिस्तानातील संवेदनशील भागात येतो. भारताने निश्चित केलेल्या टार्गेटवर हल्ला यशस्वी केला.
हेही वाचा:





