रिंकू राजगुरुने खरेदी केली पहिली कार; शेअर केले खास फोटो

Rinku Rajguru New Car | अभिनेत्री रिंकू राजगुरुला ‘सैराट’ या चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील ‘आर्ची’ या भूमिकेतील तिचा लुक, अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक वैयक्तिक आणि कामाच्या अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने नवी कोरी खरेदी केली आहे. याची पहिली झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी नव्या गाड्या घेत आपली स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये आता रिंकूच्या नावाचाही समावेश झाला आहे. रिंकूने तिच्या कमाईतून पहिली कार खरेदी केली आहे. Tata Harrier कार तिने घरी आणली आहे. स्वत: कष्टाच्या कमाईतून खरेदी केलेली ही तिची पहिलीच कार असल्याने ती खूप आनंदी आहे.
View this post on Instagram
रिंकूने कारसोबत फोटो शेअर करत लिहिले, “पहिल्या गोष्टी नेहमीच खास असतात. जेव्हा तुम्ही तुमची हक्काची पहिली कार खरेदी करता ती भावना काही औरच असत. तर हे माझं नवं प्रेम!” पांढऱ्या रंगाच्या आलिशान गाडीबरोबर रिंकूने ट्विनिंग करत फोटोशूट केलं आहे. Rinku Rajguru New Car |
रिंकूच्या या लक्झरियस कारची किंमत 10 लाखांपेक्षाही जास्त आहे. पांढरा शर्ट, काळी पँट, पांढरे शूज आणि डोक्यावर हॅट या लूकमध्ये तिने कारसोबत छान फोटोशूट केले. यानंतर चाहत्यांनसह मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत रिंकूचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, अलीकडेच रिंकू ‘झिम्मा 2’ सिनेमात पाहायला मिळाली. Rinku Rajguru New Car |
हेही वाचा:
दिल्लीतील आणखी एक घटना समोर; INA मार्केटमधील फास्ट फूड रेस्टॉरंटला भीषण आग, अनेक जण जखमी





