Pune Crime News : हडपसरमध्ये हवेत गोळीबार; मस्तीचा चेंडू भावाच्या खांद्यात आरपार घुसला !
Updated On:

पुणे : हडपसरमधील कॅनलरोड परिसरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्याच्या मुलाने मस्तीमधून हवेत गोळी झाडली, मात्र ती गोळी थेट त्याच्याच मावस भावाच्या खांद्यातून आरपार गेली. गावठी पिस्तुलातून फायर करण्यात आलं असून, ही घटना रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली.
चार युवक दोन दुचाकींवरून फिरत असताना हा गोळीबार झाला. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण गोळीबाराची गंभीरता लक्षात घेता त्याला ससून रुग्णालयात हलवण्यात आलं.
ससून प्रशासनाने याची माहिती मुंढवा पोलिसांना दिल्यावर हे प्रकरण उघडकीस आलं. सध्या पोलिसांनी तपास सुरू केला असून, हवेत फायरिंग करताना झालेल्या या ‘मस्तीचा’ प्रकार गंभीर गुन्ह्यात रूपांतरित झाला आहे.





