डोंबिवली एमआयडीसीमधील आगीचे सत्र सुरूच; आणखी एका कंपनीला लागली भीषण आग

Dombivali MIDC Fire| डोंबिवलीतील एमआयडीसीमधील इंडो अमाईन या केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. येथील अभिनव शाळेजवळ ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीनंतर परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले आहे.
या घटनेनंतर बाजूला असणाऱ्या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांनी घरी पाठवण्यात आले आहे. आजूबाजूच्या परिसरातील कारखान्यातील कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. या कंपनीच्या आजूबाजूला कारखाने असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. तसेच या आगीमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
डोंबिवली एमआयडीत अनेक केमीकल कंपन्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच या एमआयडीसीमधील एक मोठा स्फोट झाला होता. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा आग लागल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरल्याचे दिसून येत आहे. वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनेमुळे एमआयडीसीचे रहिवाशांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. Dombivali MIDC Fire|
हेही वाचा:
पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदींचा जीवनप्रवास उलगडणार रुपेरी पडद्यावर





