डोळ्यात आग, शर्टावर रक्ताचे डाग ! शाहिद कपूरचा ‘ब्लडी डॅडी’ सिनेमातील खतरनाक अंदाज

मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर तिच्या चित्रपटामुळे नेहमीच चर्चेत असतो. आपल्या अभिनयाने त्याने सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. सध्या शाहिद त्याच्या आगामी ‘ब्लडी डॅडी’ सिनेमामुळे चर्चेत आला आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यात शाहिदचा नवा लुक पाहायला मिळत आहे. सध्या ‘ब्लडी डॅडी’ या सिनेमातील शाहिदच्या लुकचं प्रचंड कौतुक होत आहे.
शाहिद कपूरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या ‘ब्लडी डॅडी’ या सिनेमाचं पोस्टर अनेकांच्या पसंतीस पडत आहे. अवघ्या एका तासात 4 लाखांहून अधिक चाहत्यांनी या पोस्टरला लाईक केले आहे. या पोस्टरमध्ये शाहिद कपूर रागात दिसत आहे. तसेच त्याच्या नाकावर जखम, डोळ्यात आग आणि शर्टावर रक्ताचे डाग दिसत आहे. पोस्टर शेअर करत शाहिदने लिहिले की, ‘ब्लडी डॅडी’चा टीझर लवकरच आऊट होईल.” याद्वारे शाहिदने पोस्टरनंतर लवकरच या चित्रपटाचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे सांगितले आहे.
‘ब्लडी डॅडी’ या सिनेमाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर हे करणार आहेत. या सिनेमात अॅक्शन सीन पाहायला मिळणार आहे. या सिनेमात संजय कपूर, डायना पेंटी, रॉनित रॉय आणि विवान भतेना हे कलाकर दिसणार आहेत. ‘ब्लडी डॅडी’ हा सिनेमा 2011 साली प्रदर्शित झालेल्या ‘न्युट ब्लँचे’ या फ्रेंच सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.
View this post on Instagram
दरम्यान, शाहिद अलीकडेच थ्रिलर वेब सीरिज ‘फर्जी’मध्ये विजय सेतुपतीसोबत दिसला होता. या सीरिजमध्ये शाहिद कपूरने सनी हे पात्र साकारलं होतं. याआधी तो ‘जर्सी’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसली होती.




