Video: दिल्लीत ताज एक्सप्रेसच्या चार डब्यांना आग, सर्व प्रवासी सुरक्षित

Fire Breaks Out Taj Express Train in Delhi Sarita Vihar: दिल्लीच्या सरिता विहारमध्ये सोमवारी ताज एक्सप्रेसच्या 4 डब्यांना आग लागली. दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला 4.24 वाजता ताज एक्सप्रेस ट्रेनच्या 4 डब्यांना आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
#WATCH | Delhi: A fire broke out in two coaches of Taj Express between Tughlakabad – Okhla. All passengers are safe: CPRO, Northern Railway
A total of 6 fire tenders were rushed to the site. There is no injury or harm to any person, said DCP Railway pic.twitter.com/GG4417ssJh
— ANI (@ANI) June 3, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन दिल्ली-आग्रा दरम्यान धावते. ओखला रेल्वे स्थानकापूर्वी ट्रेनला आग लागली. आग लागल्यानंतर ट्रेन थांबवण्यात आली. डब्यात बसलेले प्रवासी इतर डब्यांमध्ये गेल्याने किंवा खाली उतरल्याने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रेल्वेच्या डब्यांमधून प्रचंड ज्वाळा उठत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
आग कशी लागली?
रेल्वेच्या बोगींना आग कशी लागली? त्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या आगीत ताज एक्सप्रेसच्या चार बोगींचे नुकसान झाले आहे. बोगी क्रमांक D-3, D-4 पूर्णपणे जळाला आहे, परंतु बोगी क्रमांक D-2 चा फक्त काही भाग जळाला आहे. रेल्वेच्या बोगींना आग लागल्याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली. डीआरएम दिल्ली आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेचा तपास सुरू असून रेल्वेकडून पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.





