Pune News : शिवाजीनगर येथे PMPML बसला आग; अग्निशमन दलाने मिळवले आगीवर नियंत्रण
Updated On:

Pune News : येथील नरवीर तानाजी वाडी येथील पीएमपीएमएल बसला अचानक आग लागल्याची घटना आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच कसबा अग्निशमल दल घटनास्थळी दाखल झाले होते. तोपर्यंत बसला मोठ्या प्रमाणात आग लागल्याने बसचा दर्शनी भाग, काच, बाकडे, वायरिंग जळाली होती. कसबा येथील अग्निशमन दलाने पंधरा ते वीस मिनिटात आग आटोक्यात आणली.
या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या आगीत बसचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे प्रभारी अधिकारी कमलेश चौधरी, चालक नितीन सुर्यवंशी ,फायरमन हरिश बुंदिले, फायरमन प्रतिक कुंभार, मदतनीस सुमित खरात, सनी लोखंडे, दत्ता खांडरे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या आगीच्या घटनेत बस क्रमांक एम एच १२ पीक्यू ३१३७ चे मोठे नुकसान झाले आहे.





