Mumbai Fire | मुंबईतील विद्याविहार स्थानकाजवळील इमारतीला पहाटे साडेचारच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये एका सुरक्षा कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू झाला, तर दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर विद्याविहार स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली.
विद्याविहार स्थानकाजवळील तक्षशिला नीलकंठ कॉम्पेलेक्सजवळील इमारतीला भीषण आग लागली. पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी लागलेल्या या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर २० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. किरकोळ जखमी झालेल्यांना राजावाडी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विद्याविहार स्थानकाजवळ आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामन दल तात्काळ दाखल झाले आणि दोन ते तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. एकावर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरू आहे. मृत झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याचे उदय गांगण असे आहे, तर जखमी कर्मचाऱ्याचे नाव संभाजी यादव असे आहे.
तेरा मजली असलेल्या तक्षशिला इमारतीचे दोन मजल्यावर ही आग पसरली होती. इमारतीमधील फर्निचर, एसी, कपडे आणि इतर साहित्यामुळे आग अधिकच भडकली. मात्र अग्निशामन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. Mumbai Fire |
हेही वाचा:
Aamir Khan : अमिर खानने संतोष देशमुख कुटुंबीयांची घेतली भेट; मुलाला कडकडून मारली मिठी