चंदननगरमधील आंबेडकर झोपडपट्टीत भीषण आग
Updated On:

पुणे – चंदननगरमधील आंबेडकर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. येथील भंगाराच्या गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.





