कात्रज येथील खत प्रकल्पाला आग; अग्निशामक दलाचे कुलिंग ऑपरेशन सुरु
Updated On:

पुणे – स्वारगेट सातारा रस्त्यावरील कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय समोरील कचरा प्रकल्पातील खत प्रकल्पाला आग लागली. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनस्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरु आहे.
अग्निशामक दलातील 20 ते 25 कर्मचारी पहाटे पाच वाजल्यापासून आग विझवण्याचे काम करत आहे सुदैवाने कोणतीही वित्तहानी व जीवित हानी नाही.





