Pimpri : लोणावळ्यात भंगार गोदामाला आग
Updated On:

लोणावळा : शहरातील निलकमल सिनेब्लिझ थिएटर जवळील एका भंगार दुकानाला अचानक आग लागल्याने आसपासच्या परिसरातील नागरिकांची चांगलीच पळापळ झाली.
या भंगाराच्या दुकानाच्या बाजूलाच वेल्डिंगचे काम सुरू होते. वेल्डिंगच्या ठिणग्या भिंतीवर उगवलेल्या गवतावर पडल्या. गवत सुकलेले असल्याने गवताने पेट घेतला. त्यामुळे तेथील भंगार समानाने पेट घेतला.
नागरिकांनी धावपळ करीत आजूबाजूच्या घरातून, दुकानातून मोटरच्या साहाय्याने पाणी टाकून आग आटोक्यात आणली. तोपर्यंत लोणावळा नगरपरिषदेच्या अग्निशमन बंब देखील घटनास्थळी पोहचला.
खरंतर नागरिकांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे ही आग थोडक्यात आटोक्यात आली अन्यथा दुकानात ऑईलने भरलेल्या ड्रमने पेट घेतला असता तर आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले असते.





