गणेशोत्सव मंडपांबाबत योग्य तोडगा काढा : आमदार पाटील
Updated On:

पुणे – ‘करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांत प्रत्येक धर्माच्या सण-उत्सवावेळी प्रसंगानुरूप योग्य असा काही ना काही मार्ग काढत आपण पुढे गेलो आहोत. त्यामुळे यंदा गणेशोत्सव मंडपांबाबत योग्य तोडगा काढा,’ असे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे.
‘गेल्या सहा महिन्यांत झालेले सण हे व्यक्तिगतपणे साजरे करण्याचे आणि बहुतांश एक दिवसापुरते मर्यादित असणारे होते. परंतु गणेशोत्सव दहा दिवस चालणारा आहे. ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना स्वत:चे मंदिर अथवा जागा नाही अशा मंडळांना आवश्यक नियमांसह मंडप घालण्याची परवानगी द्यावी लागेल. त्यामुळे लोकांच्या भावनांचा आदर करून सर्वांचे समाधान होईल असा मार्ग काढावा,’ असेही या पत्रात म्हटले आहे.




