पिंपरी-चिंचवड | दिवंगत पत्रकाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत
Updated On:

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाच्या मासिक सभेत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष वसंतराव खांडगे, तळेगाव जनरल हॉस्पिटलचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक निकम व शहरातील युवा पत्रकार गोपाळ परदेशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यात आली.
यावेळी दिवंगत पत्रकाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली. तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाची मासिक सभा साप्ताहिक अंबरच्या कार्यालयात नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे होते. यावेळी सुरेश साकोळकर, सोनबा गोपाळे, बी.एम. भसे, सुनील वाळुंज, अतुल पवार, गणेश बोरुडे, राजेश बारणे, प्रभाकर तुमकर आदी उपस्थित होते.





