अखेर चर्चा खरी ठरली! कतरिना-विकी होणार आई-बाबा; स्वत: पोस्ट शेअर करत दिली ‘गुड न्यूज’

Katrina Kaif Pregnancy | अभिनेत्री कतरिना कैफ गरोदर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. नुकतेच बेबी बंपसोबत ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत कतरिनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही बातमी सांगितली आहे. आता कतरिना कैफ आणि विकी कौशल आई-बाबा होणार आहेत. लवकरच त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
विकी-कतरिनाने सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर एक सुंदर, ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत सर्वांना आयुष्यात येणाऱ्या गोड पाहुण्याबद्दल सांगितलं. यामध्ये एक फोटो प्रिंट असलेली फ्रेम असून त्यात गरोदर कतरिना आणि विकी कौशल बेबी बंपकडे प्रेमाने पहात असल्याचं दिसते. ‘आनंद आणि कृतज्ञतेने भरलेल्या अंतःकरणासह आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय सुरू करण्याच्या मार्गावर…’ असे कॅप्शनही त्यांनी या पोस्टला दिले आहे.
View this post on Instagram
काही महिन्यांपूर्वी त्या दोघांचा एअरपोर्टवरील फोटो प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये व्हाईट लूज ड्रेसमध्ये कतरिना दिसल्यावर प्रेग्नन्सीच्या चर्चांनी जोर धरला. परंतु कतरिना किंवा विकीने याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. तर गेल्या आठवड्यात आर्यन खानच्या चित्रपटाच्या रिलीजसाठीही विकी कौशल एकटाच आला होता, तेव्हाही कतरिना सोबत नसल्याने चर्चांना अधिक बळ मिळाले.
याशिवाय गेल्या आठवड्यातच कतरिनाचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका लालसर रंगाच्या गाऊनमध्ये, बेबी बंपसह कतरिना पाहायला मिळाली होती. एका रेडिट यूजरने तो फोटो शेअर केला होता. मात्र त्यावर कोणतीच अधिकृत कमेंट समोर आली नव्हती. अखेर आता ही चर्चा खरी ठरली आहे.
दरम्यान, 9 डिसेंबर 2021 मध्ये विकी-कतरिनाचे राजस्थानमध्ये थाटामाटात लग्न झाले. आता लग्नाच्या चार वर्षानंतर ते आई-बाबा होणार आहेत.
हेही वाचा :





