Priyanka Chopra : अखेर चर्चांना पूर्णविराम! प्रियांका चोप्रा या चित्रपटातून बॅालिवूडमध्ये करणार कमबॅक

Shah Rukh Khan | Priyanka Chopra | गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्रियांका चोप्रा बॅालीवूडमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अखेर प्रियांका बॅालीवूडमध्ये एका बिग बजेट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिनेता शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेल्या डॅान चित्रपटात प्रियांकाने अभिनय केला होता. शाहरूख आणि प्रियांकाची अॅान स्क्रिन केमेस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये हे दोघे एकत्र दिसले होते.
सध्या डॅान ३ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटातून रणवीस सिंह मुख्य भूमिकेत असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याच चित्रपटातून प्रियांका चोप्रा बॅालीवूडमध्ये धमाकेदार कमबॅक करणार आहे. डॅान आणि डाॅन २ नंतर शाहरुख आणि प्रियांकाच्या अफेरअरच्या चर्चाही बीटाऊनमध्ये होत होत्या. परंतु, याबाबत कोणीही अधिकृत दुजोरा दिलेल्या नाही.
बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर त्याच्या ‘डॉन-३’ या चित्रपटाबाबत खूप उत्सुक आहे. या चित्रपटात प्रियांका एका कॅमिओमध्ये दिसणार आहे. याबाबत प्रियांकासोबत चर्चा केली सुरू असून, बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, प्रियांका चोप्रा डॉन ३ मध्ये रोमा म्हणून परतू शकते, असे सांगण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, डॉन ३ चे शूटिंग २०२६ च्या जानेवारी महिन्यात सुरू होणार आहे. हा चित्रपट वर्षाच्या अखेरीस थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकतो.
हेही वाचा : राजकुमार राव आणि पत्रलेखा होणार आई-बाबा; शेअर केली खास पोस्ट





