अखेर सुरज चव्हाणचं लग्न ठरलं ! कोकण हार्टेड गर्लने घेतली होणाऱ्या वहिनीची भेट

Suraj Chavan | ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाणने काही दिवसांपूर्वी एका मुलीसोबतचा फोटो शेअर केला होता. ज्यानंतर तो लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र ती मुलगी कोण आहे? याबाबत त्याने कोणताही खुलासा केला नव्हता.
अखेर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकर हिने पोस्ट शेअर करता सुरजचे लग्न ठरले असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अंकिताने लग्नाला येणं शक्य नसल्यानं भेट घेतली असल्याचं स्टोरीत म्हटले आहे.
कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू-वालावलकर हिने सूरजच्या गावी रविवारी भेट दिली. यावेळचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले. यातील एका फोटोत ती सूरजसोबत त्याच्या नव्या घरासमोर उभी आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती तरुणीसोबत दिसते. मात्र अंकिताने त्या तरुणीचा चेहरा लपवला आहे.
अंकिताने कॅप्शनमध्ये म्हटले की, ‘लग्नाला येणं शक्य होणार नाही म्हणून ही भेट. सूरजला खूप खूप शुभेच्छा.’ अंकिताच्या या पोस्टमुळे सूरज चव्हाणचे लग्न ठरल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाला आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी सूरज चव्हाणने एका तरुणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत तो दाक्षिणात्य वेशभूषेत दिसत होता आणि कॅप्शनमध्ये फक्त लव्ह इमोजी टाकले होते. Suraj Chavan |
तर फोटोतील तरुणीने आपला चेहरा हाताने झाकल्यामुळे ती कोण आहे आणि सूरजचे लग्न ठरले का? असा सवाल केला जाऊ लागला. मात्र अंकिताने या चर्चांवर खुलासा केला आहे. तसेच सूरज गावी घर बांधत असून या नवीन घरात तो त्याच्या बायकोचं स्वागत करणार असल्याची चर्चा आहे. Suraj Chavan |
हेही वाचा :
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची कार पेटवली, जालन्यातील घटनेने खळबळ; मनोज जरांगेंवर आरोप





