Ekta Kapoor : ‘नागिन 7’च्या एपिसोडमध्ये मोठी चूक, ट्रोल होताच एकता कपूर म्हणाली…
Ekta Kapoor : अनेक युझर्सनी निर्मिती आणि एडिटिंग टीम्सच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला

Ekta Kapoor : एकता कपूरच्या ‘नागीन’च्या सातव्या सीझनमध्ये एका ‘ड्रॅगन’चा सीन दाखवण्यात आला होता. प्रियांका चहर चौधरी मुख्य भूमिकेत असलेल्या या मालिकेच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका एपिसोडमध्ये मोठी चूक निदर्शनास आली. यावरून अनेक सोशल मीडिया युझर्सनी ‘नागीन 7’ मधील सीन शेअर करत एकता कपूरला ट्रोल केले आहे.
समोर आलेल्या व्हिडिओत, नागीन 7 मधील एका ॲक्शन सीनमध्ये एडिटर बॅकग्राऊंडमधील ‘ब्लू स्क्रीन’ म्हणजेच ‘क्रोमा’ काढून टाकायलाच विसरले. या सीनध्ये अहाना म्हणजेच प्रियंका चहर चौधरीने साकारलेली भूमिका आपल्या शत्रूंशी लढताना दिसते.
Khichdi Recipe: “उन्हाळ्यात पोट बिघडलं तर काय खाल? ‘अशा’ पद्धतीने केलेली खिचडी देईल झटपट आराम!”
हा संपूर्ण सीन ‘क्रोमा की’ तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रित करण्यात आले होता. त्यातील एका विशिष्ट भागाचे एडिटिंग करताना एडिटरकडून चूक झाली.
View this post on Instagram
हा सीन पाहिल्यानंतर, अनेक युझर्सनी निर्मिती आणि एडिटिंग टीम्सच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. निर्मात्यांकडून इतकी मोठी चूक नेमकी कशी होऊ शकते, असा सवाल आता केला जात आहे. तसेच अनेकांनी या चुकीची खिल्ली उडवली आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट –
‘नागीन 7’चे काम उरकण्याची त्यांना इतकी घाई झाली होती की, त्यांना त्याचे योग्यरित्या एडिंगही करायलाही वेळ मिळाला नाही,” “कदाचित त्यांना प्रेक्षकांना हेच दाखवायचे असावे की एडिटिंगसाठी किती मेहनत घ्यावी लागते आणि प्रत्येक गोष्ट पूर्णपणे ‘एआय’वर सोपवता येत नाही,” अशा कमेंट नेटकऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. ज्यावर एकता कपूरने “अगदी बरोबर”, असे सुरू झालेल्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा:
Shwetank Tambe passed away : ठाकरेसेनेचा युवा चेहरा हरपला! Shwetank Tambe यांचं आकस्मित निधन





