कात्रज : कात्रज विकास आघाडीच्या वतीने संस्थापक नमेश बाबर यांच्या पुढाकाराने तीन वर्षे सातत्याने उपोषणे,आंदोलने करून राज्यशासनाचे लक्ष वेधलेल्या कात्रज एकात्मिक विकास आराखड्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले आणि सभेस भर उन्हात उपस्थित हजारो नागरिकांची मने जिंकली.यावेळी पुण्यात शिवसेना एकटे लढत आहे म्हणून आम्हाला कुणी हलक्यात घेऊ नका.एकनाथ शिंदे हा काम करणारा आहे.तुम्ही शिवसेनेचे उमेदवार निवडून द्या तुमच्या विकासाची जबाबदारी मी घेतो असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. प्रभाग ३८ मधील शिवसेना व कात्रज विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार स्वराज नमेश बाबर, अनिल कोंढरे,प्राजक्ता श्रीकांत लिपाने,वनिता जालिंदर जांभळे व संध्या राजेंद्र बर्गे यांच्या प्रचारासाठी कात्रज भाजी मंडई येथे सभा पार पडली यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी शिंदे म्हणाले,मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कॉमन मॅन म्हणून काम केले.लाडकी बहीण योजना आणली,मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून हजारो रुग्णांना मदत केली.सामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून योजना आणल्या त्या बंद होऊ देणार नाही. यावेळी शिंदे यांनी जोरदार शेरोशयरी करत एक बार मैने कमिंटमेंट कर दी, तो मै खुद की नही सूनता..असे म्हणत कात्रज विकास आराखड्याला निधी कमी पडू देणार नसल्याचा विश्वास दिला. प्रास्ताविक नमेश बाबर यांनी करत, कात्रज पालिकेत समाविष्ट होऊन २८ वर्षाच्या अविकास रुपी अन्यायाचा अंत झाला.मूलभूत सुविधांसाठी ३५ कोटी निधीचा शासन निर्णय,जांभूळवाडी तलाव सुशोभीकरण ५८ कोटी,समाविष्ठ गावात ड्रेनेज व्यवस्था १५९ कोटी असे २५२ कोटींच्या विकास कामे मार्गी लागली.एकात्मिक विकास आराखड्याने कात्रजकरांचे जीवनमान उंचावेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी।मंत्री उदय सामंत म्हणाले,स्वराज बाबर सारख्या उच्च शिक्षित तरुण चेहऱ्यासोबत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या मागे नागरिकांनी उभे राहावे असे आवाहन केले.विकासापासून वंचित ठेवणाऱ्या विरोधकांना जनतेच्या पाठिंब्याने कात्रज घाट शिवसेना दाखवेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत,आमदार तानाजी सावंत,माजी आमदार रविंद्र धंगेकर,शहरप्रमुख नाना भानगिरे, नमेश बाबर आदींसह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.