Alpha trailer : अखेर ALPHA मध्ये शर्वरीची झलक दिसली पण..; ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, शेवटी दिसणार ‘ती’ व्यक्ती कोण?
Alpha trailer : २ मिनिटे ३३ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये रहस्य, अॅक्शन आणि थरार यांचा जबरदस्त संगम पाहायला मिळतो.

Alpha trailer : बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित ‘अल्फा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या अॅक्शनपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला असून, चाहत्यांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
याआधी प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये शर्वरी वाघची झलक न दाखवल्याने चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आता ट्रेलरमध्ये शर्वरीचा दमदार अंदाज पाहायला मिळत असून ती आलिया भट्टसोबत अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. तरीही ट्रेलरमध्ये आलियाचा प्रभाव अधिक ठळकपणे जाणवत असल्याची चर्चा रंगली आहे. (Alpha trailer)
२ मिनिटे ३३ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये रहस्य, अॅक्शन आणि थरार यांचा जबरदस्त संगम पाहायला मिळतो. ‘अल्फा’ नावाच्या एका गूढ प्रोजेक्टभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसते. या मिशनमध्ये आलिया आणि शर्वरी आमनेसामने उभ्या ठाकल्याचेही ट्रेलरमधून स्पष्ट होते. (Alpha trailer )
हेही वाचा : Sanchita Ugale : 6 महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होती संचिता; पोलिसांच्या हाती लागले ते महत्त्वाचे चॅट्स
चित्रपटातील संवादही लक्ष वेधून घेत आहेत. विशेषतः आलिया भट्टच्या तोंडी असलेला, “सीता आज लंका खुद जलाने आई है” हा संवाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
याशिवाय अभिनेता बॉबी देओलचा खतरनाक लूकही ट्रेलरमधून समोर आला आहे. अलीकडेच ‘बंदर’ चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या बॉबीचा हा वेगळा अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. (Alpha trailer )
ट्रेलरच्या शेवटी दिसलेली हृतिक रोशनची झलकही प्रेक्षकांसाठी मोठे सरप्राईज ठरली आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
दमदार स्टारकास्ट, अॅक्शन आणि रहस्यमय कथानकाने सजलेला ‘अल्फा’ हा चित्रपट ३ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, ‘अल्फा प्रोजेक्ट’मागचे रहस्य नेमके काय आहे, याचा उलगडा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच होणार आहे. (Alpha trailer)





