Filmfare Awards : सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आलिया भट्ट; फिल्मफेअर पुरस्कार 2023च्या विजेत्यांची संपूर्ण यादी वाचा

मुंबई – मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये काल गुरुवारी 68 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आलिया भट्ट, अनिल कपूर, रेखा, जान्हवी कपूर, नोरा फतेही, विकी कौशल आणि इतर कलाकारांनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. यावर्षी फिल्मफेअर अवॉर्ड्सचा कार्यक्रम सलमान खानने होस्ट केला. तर आयुष्मान खुराना-मनीष पॉल यांनी देखील त्याची साथ दिली.
यावेळी, फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार राजकुमार रावला मिळाला, तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब मिळाला. याशिवाय संजय लीला भन्साळी यांना ‘गंगुबाई काठियावाडी’साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ने 10 कॅटेगरींमध्ये पुरस्कार जिंकले, तर अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र: भाग 1 शिवा’ या चित्रपटालाही 4 कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाले.
Congratulations!
The Filmfare Award for Best Actor in a Leading Role (Female) goes to #AliaBhatt for #GangubaiKathiawadi at the 68th #HyundaiFilmfareAwards 2023 with #MaharashtraTourism. pic.twitter.com/RdstVHAgI4
— Filmfare (@filmfare) April 27, 2023
फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 विजेत्यांची यादी –
लाइफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार- ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा
सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर फिमेल -कविता सेठ – रंगीसारी जुग जुग जियो
सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर मेल – अरिजित सिंग – (केसरीया)- ब्रम्हास्त्र
सर्वोत्कृष्ट गीत – अमिताभ भट्टाचार्य (केसरीया) – ब्रम्हास्त्र
सर्वोत्कृष्ट संगीत – प्रीतम – ब्रम्हास्त्र
आर.डी.बर्मन स्मृती विशेष पुरस्कार – जान्हवी श्रीमंकर – गंगुबाई काठियावाडी (ढोलिडा)
सर्वोत्कृष्ट VFX – DNEG आणि Redefine ब्रह्मास्त्र
सर्वोत्कृष्ट डेब्यू डायरेक्टर – जसपाल सिंग संधू आणि राजीव बर्नवाल – वध
सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड स्कोर – संचित बलहारा आणि अंकित बलहारा – गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट अँक्शन: परवेझ शेख – विक्रम वेधा
सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी – सुदीप चॅटर्जी – गंगुबाई काठीयावाडी
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी – कृती महेश (ढोलीडा) – गंगुबाई काठीयावाडी
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन – सुब्रता चक्रबोर्ती, अमित रॉय – गंगुबाई काठीयावाडी
सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन – बिश्र्वदीप दीपक चॅटर्जी – ब्रह्मास्त्र
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शीबा चढ्ढा – बधाई दो
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – अनिल कपूर- जुग जुग जियो





