पिंपरी – पिंपरी मधील संत तुकाराम नगर येथे भीषण आग लागली. ही घटना आज (मंगळवारी, दि. 19) सकाळी घडली.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सव्वाअकरा वाजता पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या मुख्य विभागास फोनवरून माहिती मिळाली की, वायसीएम रुग्णालयाच्या मागील बाजूला आग लागली आहे.
धुराचे लोट लांबून दिसत असल्याने ही आग मोठी असण्याची शक्यता आहे. नेमकी कशाला आग लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही.
अग्निशमन विभागाने वल्लभनगर मुख्य केंद्राचे दोन, चिखली आणि भोसरी उपकेंद्राचे प्रत्येकी एक असे चार बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत. घटनेतील जखमींची माहिती अद्याप समजू शकली नाही.