FIA : ‘एफआयए’च्या 44 व्या ‘इंडिया डे परेड’मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा चित्ररथ विशेष आकर्षण
‘फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स’ने (FIA) रविवारी, १६ ऑगस्ट रोजी ४४व्या वार्षिक ‘इंडिया डे परेड’चे उत्साही आयोजन केले.

FIA : ‘फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स’ने (FIA) रविवारी, १६ ऑगस्ट रोजी ४४व्या वार्षिक ‘इंडिया डे परेड’चे उत्साही आयोजन केले. ‘वारसा आणि सुसंवाद’ या संकल्पनेखाली मॅनहॅटनमधील मॅडिसन अव्हेन्यूवर झालेल्या या मिरवणूकीला अंदाजे २ लाख प्रेक्षकांनी उपस्थिती लावली. यंदाची ही मिरवणूक भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन आणि अमेरिकेचा आगामी २५०वा वर्धापनदिन यांना समर्पित करण्यात आली होती.
न्यूयॉर्क राज्याच्या गव्हर्नर कॅथी होकुल यांनी परेडच्या (FIA) मार्गावर या मिरवणुकीचे नेतृत्व केले. त्यांच्यासोबत न्यूयॉर्क राज्याचे सिनेटर जेरेमी कूनी, काँग्रेस सदस्य श्री ठाणेदार, विधानसभा सदस्य डेव्हिड वेप्रिन आणि रिपब्लिकन पक्षाच्या अॅटर्नी जनरलपदाच्या उमेदवार सरिता कोमिरेड्डी यांच्यासह निवडून आलेले लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.
प्रमुख अतिथी आणि बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे, अभिनेता-दिग्दर्शक अदिवी शेष आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेचे कलाकार या मिरवणूकीचे विशेष आकर्षण ठरले. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या चित्ररथाने मॅडिसन अव्हेन्यूवर मोठी गर्दी खेचली. या चित्ररथावर निर्माते असित कुमार मोदी यांच्यासह दिलीप जोशी, मंदार चांदवडकर, मुनमुन दत्ता, सोनालिका जोशी, बलविंदर सिंग सुरी आणि नितीश भलुनी इत्यादी कलाकार सहभागी झाले होते.
सांस्कृतिक संस्था, व्यावसायिक संस्था आणि प्रादेशिक संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे एकूण ५५ चित्ररथ मॅडिसन अव्हेन्यूवरून मार्गक्रमण करत होते. त्यांच्यासोबत बँड पथके, नृत्यपथके आणि विविध प्रादेशिक कलाकार सहभागी झाले होते. न्यूयॉर्कमधील भारताच्या वाणिज्य दूतावासाचाही चित्ररथ यात सहभागी होता.
मिरवणूकीच्या मार्गालगत ‘एफआयए’ने मॅडिसन आणि पार्क अव्हेन्यूदरम्यान ट्वेन्टिसिक्स्थ ईस्ट स्ट्रीटवर विशेष खाद्य महोत्सव आणि समुदायांसाठी स्टॉल्सचे आयोजन केले होते. तसेच ट्वेन्टिसिक्स्थ ईस्ट आणि ट्वेन्टिफिफ्थ ईस्ट स्ट्रीट दरम्यान वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात दुपारभर पारंपरिक संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम सादर करण्यात आले. ‘एफआयए’चे चेअरमन अंकुर वैद्य आणि प्रेसिडेंट श्रीकांत अक्कापल्ली, यांनी मान्यवरांचे स्वागत आणि संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन केले.
‘एफआयए’ विषयी:
‘फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स’ (एफआयए) ही अमेरिकेत भारतीय संस्कृती आणि वारसा यांचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेली ना-नफा संस्था आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक (FIA) आणि नागरी कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय-अमेरिकन समुदाय आणि व्यापक अमेरिकन समाज यांच्यातील संबंध अधिक दृढ करणे, हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.






