“मी तापानं फणफणत होतो, गोमूत्र पिऊन बरा झालो” ; आयआयटीच्या संचालकाचा मोठा दावा

V.Kamakoti । आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी हे सध्या चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. कारण त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कामकोटी गोमूत्राच्या औषधी गुणधर्मांचं कौतुक करताना दिसत आहेत. त्याच्या या व्हिडिओवर आता संमिश्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
“कामकोटी यांचे वक्तव्य हे हास्यास्पद” V.Kamakoti ।
कामकोटी १५ जानेवारी २०२५ रोजी मट्टू पोंगलच्या दिवशी ‘गो संरक्षण शाळे’त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. तिथे ते देशी गायींचे संरक्षण करणे आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याविषयी बोलत होते. त्याचवेळी त्यांनी गोमूत्र पिऊन ताप दूर केल्याची गोष्ट सांगितली. व्ही. कामकोटी हे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, “एकदा ते तापानं फणफणत असताना त्यांनी गोमूत्र प्राशन केलं. त्यानंतर ते लगेच बरे झाले. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस व द्रमुक पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. तर काहींनी “कामकोटी यांचं वक्तव्य हे हास्यास्पद आहे” असे त्यांनी म्हटले आहे.
VIDEO | Tamil Nadu BJP President K Annamalai (@annamalai_k) says, “It’s unfortunate that our Chennai IIT Director, who is a very decorated person, who is an expert in AI, quantum computing, he chose to follow his dharma. He chose to pray to god in his own way. That is being… pic.twitter.com/cdJUrwZk3B
— Press Trust of India (@PTI_News) January 19, 2025
कामकोटी यांनी गोमूत्रातील अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल व पचन सुधारण्याच्या गुणधर्मांबद्दल सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी गोमूत्राचे कथित औषधी गुणधर्म सांगितले. तसेच ते म्हणाले, “मोठ्या आतड्यांशी संबंधित आजार इरिटेबल बोवेल सिंड्रोमसारख्या समस्यांवर गोमूत्र उपयुक्त आहे”. कामकोटींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस व द्रमुक नेते त्यांच्यावर टीका करू लागले आहेत. तर, भाजपा नेत्यांनी कामकोटींच्या वक्तव्याचे कौतुक केले.
“…तर आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन करू” V.Kamakoti ।
डीएमके नेते टी. के. एस. एलंगोवन म्हणाले, “कामकोटींचं वक्तव्य हास्यास्पद आहे. देशाची शिक्षणव्यवस्था बिघडवणं हेच केंद्र सरकारचं धोरण असल्याचं पाहायला मिळत आहे”. तर के. रामकृष्णन म्हणाले, “कामकोटी यांनी जे काही दावे केले आहेत त्याबाबतचे पुरावे देखील सादर करायला हवेत, अन्यथा त्यांनी माफी मागावी. त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन करू”.असे म्हटले आहे.
कार्ती चिदंबरम यांची टीका
दरम्यान, काँग्रेस नेते कार्ती पी. चिदंबरम यांनी देखील कामकोटी यांच्या वक्तव्याची निंदा केली आहे. ते म्हणाले, “आयआयटी मद्राससारख्या संस्थेच्या संचालकाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं अनुचित आहे”.





