FDA: हाॅटेल ‘चूल मटन’वर एफडीएची कारवाई

FDA: अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत नियम धाब्यावर बसविणाऱ्या आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे. लोहगाव येथील हाॅटेल चूल मटनमध्ये स्वच्छता व आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन आढळल्याने या आस्थापनेचा परवाना निलंबित केला.
पुणे विभागात १४ ते १७ ऑगस्टदरम्यानच्या कारवाईत तब्बल १० लाख ७ हजार ४६० रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करून तीन एफआयआर दाखल करत सात जणांना अटक केली.
नगर रोडवरील जकात नाका, खांदवेनगर, लोहगाव येथील हाॅटेल चूल मटनची एफडीएकडून तपासणी केल्यानंतर स्वच्छता आणि आरोग्यविषयक आवश्यक निकषांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने परवाना फोर्थविथ निलंबित केला आहे.
सुधारणा होईपर्यंत अन्न व्यवसाय सुरू न करण्याचे निर्देशही दिले आहेत. दरम्यान, तीन आस्थापनांमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ आढळल्याने तीन एफआयआर, सात अटक, दोन आस्थापना सील आणि एक वाहन जप्त केले आहे.





