FBI Director Kash Patel । भारतीय वंशाचे काश पटेल यांची अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ म्हणजेच एफबीआयच्या संचालकपदी निवड झाली आहे. काल सिनेटने त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. हे पद त्यांनी अगदी काहीशा फरकाने मिळवण्यात यश मिळवले आहे.दरम्यान, सिनेटच्या मंजुरीनंतर लगेचच त्यांनी या नवीन जबाबदारीबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले. यासोबतच त्यांनी एक इशाराही दिला. कशी पटेल यांनी, “अमेरिकन नागरिकांना इजा पोहोचवू इच्छिणाऱ्या कोणालाही आम्ही सोडणार नाही.”असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला. काश पटेल यांनी सोशल मीडियावर आपल्या निवडीसंर्भात एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी, ‘एफबीआयचे नववे संचालक म्हणून निवड झाल्याचा मला सन्मान आहे. माझ्यावर अढळ विश्वास आणि पाठिंब्याबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि अॅटर्नी जनरल बोंडी यांचे आभार.” असे त्यांनी म्हटले आहे. ‘आम्ही एफबीआयवरील लोकांचा विश्वास पुनर्संचयित करू’ FBI Director Kash Patel । “एफबीआयकडे जी-मेन (दुसऱ्या महायुद्धातील एफबीआय एजंट) पासून ते ९/११ च्या हल्ल्यानंतर आपल्या राष्ट्राचे रक्षण करण्यापर्यंतचा एक अविश्वसनीय वारसा आहे,” असे त्यांनी म्हटले. तसेच काश यांनी,”अमेरिकन लोकांना पारदर्शक, जबाबदार आणि न्यायासाठी वचनबद्ध असलेल्या एफबीआयची आवश्यकता आहे” असे म्हटले आहे. पुढे त्यांनी लिहिले, ‘आपल्या न्यायव्यवस्थेच्या राजकारणीकरणामुळे जनतेचा विश्वास उडाला होता, पण आता असे होणार नाही. एफबीआय संचालक म्हणून माझे ध्येय स्पष्ट आहे: चांगल्या पोलिसांना पोलिस राहू द्या आणि एफबीआयवरील विश्वास पुन्हा निर्माण करा. ‘ज्यांना अमेरिकेचे नुकसान करायचे आहे..’ FBI Director Kash Patel । काश पटेल यांनी लिहिले, ‘ब्युरो आणि इतर भागीदारांमधील समर्पित पुरुष आणि महिलांसोबत काम करून, आम्ही एक अशी एफबीआय पुन्हा तयार करू ज्याचा अमेरिकन लोकांना अभिमान वाटेल. जे अमेरिकन लोकांना हानी पोहोचवू पाहतात त्यांनी हा इशारा समजावा, कारण आम्ही त्यांचा पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात पाठलाग करू.’असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.