‘फादर्स डे’ शहा ग्लोबल स्कूलमध्ये उत्साहात साजरा; बाबांसाठी चिमुकल्यांनी सादर केले वेगळे उपक्रम

नीलकंठ मोहिते
इंदापूर : शहरातील शहा ग्लोबल स्कुलमध्ये, फादर्स डे निमित्त स्कुलमधील सर्व विद्यार्थ्यांच्या वडिलांना शाळेत आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थी आणि पालक यांच्यातील संवाद वाढावा यासाठी, सुसंगत खेळांचे आयोजन, शहा ग्लोबल स्कुलचे मुख्य व्यवस्थापक अंगद शहा, रुचिरा अंगद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी फादर्स डे उत्साहात साजरा करण्यात आला.
फादर्स डे रविवारी असल्याने त्या दिवशी शाळेला सुट्टी होती. त्यामुळे शनिवारी (दि. 14 जून) रोजी सकाळी 10.30 वाजता, कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थांनी स्वतःच्या बाबांसाठी विविध सुंदर पोस्टर तयार केले होते, तसेच वडिलांचे महत्व अधोरेखित करणारे सुविचाराचे पोस्टर स्वहस्त लिखित तयार केले होते. यावेळी स्कूलच्या वतीने सर्व पालकांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी इयत्ता चौथीची विद्यार्थिनी अनुश्री मगर हिने वडिलांविषयी आपले मनोगत व्यक्त केले, तर इयत्ता तिसरी मधील विद्यार्थी राजवीर इजगुडे यांनी वडिलांविषयी विचार मांडले. इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी मिरा सागर शिंदे हिने वडिलांसाठी सुंदर असे गीत गायले.आपली कल्पकता दाखवीत, प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी,स्वहस्तक्षरात बनविलेले ग्रीटिंग कार्ड, आपल्या बाबांसाठी चिमुकल्यांकडून वेगळे उपक्रम ठरले आकर्षक ठरले.
यावेळी शहा ग्लोबल स्कूलच्या वतीने मनोरंजनाच्या उद्देशाने विद्यार्थी पालकांच्यासाठी, मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका विद्या दरेकर यांनी केले तर आभार शिक्षिका विद्या कराडे यांनी मानले.





